काश्मीर खोऱ्यात, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना केलं ठार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काश्मीर खोऱ्यात, आज पहाटे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी भागातील वानिगम पायन इथं सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात काही दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने पायन परिसरात घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. संयुक्त पथक संशयित घटनास्थळी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले असून त्यांची ओळख पटवली जात आहे. दहशतवाद्यांकडून एक एके 47 रायफल आणि एक पिस्तूलसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.