जलद न्यायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचं न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) न्यायव्यवस्थेवरचा वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणार्‍या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणं गरजेचं असून, त्यासाठी आधुनिनिकीकरणाचा स्वीकर केला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केलं. धाराशिव शहरात काल आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वकिल परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय राज्यघटनेमुळ आपला देश एकसंघ आहे. राज्यघटनेच्या निर्मितीत महत्वाचे योगदान असलेले महामानव डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबवडे गावाचा तालुका असलेल्या मंडणगड येथे अजूनही न्यायालय नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अ‍ॅड. मिलींद पाटील यांनी केलं. यावेळी त्यांनी धाराशिवच्या ६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या उपस्थितीत वकिल परिषद घेण्याचा मान बार कौन्सिलला मिळाल्याबद्दल  समाधान व्यक्त केलं. या कार्यक्रमात राज्यातल्या १४ ज्येष्ठ विधीज्ञांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.