पारंपरिक खेळाला नवसंजीवनी


          

पिंपरी पूर्वी शाळेला सुट्टी लागल्यानंतर गल्ली - बोळात लपा-छपी, गोटया, चिपळ्या, सागरगोटे इत्यादी खेळासोबत बालचमुंचा किलबिलाट असायचा. परंतु, हल्ली इंटरनेटच्या या काळात हे खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सोसायटीच्या या महानगरीत, मैदाना अभावी मुले घरातच टीव्ही पाहणे व मोबाइलवर गेम खेळण्यातच गुरफटून चालली आहेत. परिणामी लहान वयातच शारीरिक व मानसिक आजाराने कमकुवत होत चालली आहेत. याला कारण म्हणजे कोणता खेळ खेळायचा असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. बऱ्याच जणांना तर हे देशी खेळ माहीतच नाहीत. म्हणूनच ओम प्रतिष्ठान संस्थेने सर्व वयोगटातील मुलांसाठी या पारंपारिक खेळाचे मोफत आयोजन केले आहे. यात विट्टी-दांडू, गोटया, भोवरा, चिपळ्या, सागरगोटे, चल्लस-आठ, रुमाल उडवी, कांदा-फोडी, कोया, चाकाची चक्री, लिंगोर्चा, आप्पा-रप्पी, गिलोरी, आट्या-पाट्या इत्यादी खेळ शिकविले जाणार आहेत.

या खेळांमुळे मुले सुदृढ तर बनतीलच. परंतु त्या सोबतच मुलांचे संवाद कौशल्य, निर्णय क्षमता, निर्भीडपणा, चपळता, सांघिक वृत्ती, अचूक अंदाज बांधणी इत्यादी गुण वाढीस लागतात. परिणामी मुलांचे शारीरिक व मानसिक संतुलन विकसित होण्यास मदत होते. पारंपरिक खेळाच्या माध्यमातून निखळ आनंद व मनोरंजनातून व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी, सर्व पालकांनी आपल्या पाल्याचा सहभाग अवश्य नोंदवावा असे आव्हाहन संस्थेच्या अध्यक्षा वनिता सावंत यांनी केले आहे.

कालावधी

६ मे ते १० मे - सायंकाळी ५ ते ७

स्थळ : विद्यांगण  हायस्कूल, लक्ष्मी नगर, भालचंद्र विहार जवळ, रावेत.

पूर्व नोंदणी आवश्यक

संपर्क क्रमांक :- 9881665151, 779863334

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image