हज प्रतिनियुक्तीसाठी दोन दिवसीय अभिमुखता-सह-प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हज प्रतिनियुक्तीसाठी दोन दिवसीय अभिमुखता-सह-प्रशिक्षण कार्यक्रमाचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी आज उद्घाटन केले. यावर्षीच्या हज यात्रेदरम्यान एक लाख ७५ लाख यात्रेकरूंच्या वैद्यकीय आणि प्रशासकीय सोयींसाठी एकूण ४६८ प्रतिनियुक्तीची निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की, यंदा चार हजार तीनशेहून अधिक महरम नसलेल्या महिला हजला जाणार असून ही आजपर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. भारतीय यात्रेकरूंच्या हज यात्रेचा खर्च कमी करण्यावर सरकार भर देत आहे.