बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. बुद्ध पौर्णिमा हा, ज्यांनी मानवतेला विचार आणि कृतीत अभिजाततेकडे मार्गदर्शन करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलं, त्या  गौतम बुद्धांच्या गहन शिकवणींवर चिंतन करण्याचा दिवस आहे, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

गौतम बुद्धांचा अहिंसा, सहिष्णुता आणि शांतीचा संदेश शतकानुशतके प्रतिध्वनीत होत असून, आदर्श समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत असल्याच त्यांनी म्हटलंय. या मंगल प्रसंगी आपण भगवान बुद्धांच्या धम्माच्या तत्त्वांनुसार स्वतःला समर्पित करूया आणि सर्व प्राणिमात्रांप्रती करुणा आणि दयाळूपणा या गुणांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करूया असं धनखड यांनी म्हटलं आहे.  

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image