जीडीपीच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्र हे देशात जीडीपीच्या तुलनेत सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य ठरलं आहे. विशेष म्हणजे थकीत कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातल्या ३१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत जीएसडीपीच्या तुलनेत महाराष्ट्रावर सर्वाधिक कमी १७ पूर्णांक १ दशांश टक्के कर्ज आहे. जम्मू-काश्मीवर सर्वाधिक कर्ज आहे. तर इशान्येकडील सर्व राज्य कर्ज मर्यादेच्या उंबरठ्यावर आहेत. उत्तर प्रदेशावर सर्वाधिक रुपयांचे थकीत कर्ज असून, तामिळनाडू तिसऱ्या स्थानी आहे. सर्व राज्यांनी वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन लागू केलेले असल्यामुळे त्यांना जीएसडीपीविषयक निकषांचं  पालन करणं  आवश्यक आहे.