बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र गैरसमजातून लिहिलं होतं - माजी मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र गैरसमजातून लिहिलं होतं. ती अंतिम भूमिका नव्हती असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला. तेल शुद्धीकरण प्रस्तावित असलेल्या सोलगावला त्यांनी भेट दिली. तसंच बारसू इथल्या कातळशिल्पांची पाहणी केली. त्यानंतर ते वार्ताहरांना संबोधित करत होते. स्थानिकांच्या सहमतीशिवाय हा प्रकल्प होऊ नये. सरकारनं प्रकल्पासाठी स्थानिकांशी चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं.