सीबीएसईच्या १२ वीच्या परीक्षेत ८७ टक्क्याहून अधिक, तर १० वीच्या परीक्षेत ९३ टक्क्याहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण

 

Uploading: 411991 of 411991 bytes uploaded.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत  जवळपास ८७ पूर्णांक ३३ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी ९३ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल मंडळाच्या, cbse.gov.in आणि results.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील पाहू शकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. १२ वी च्या परीक्षेत ज्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही, त्या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळाकडे लक्ष दिलं पाहिजे, एक परीक्षेत विद्यार्थ्याला जोखता येत नाही, ज्या क्षेत्रांबद्दल आस्था आहे, त्यात विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता उपयोगात आणावी, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे.