नागरी सेवा या प्रशासनाच्या आधारस्तंभ असतात - उपराष्ट्रपती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी सेवा या प्रशासनाच्या आधारस्तंभ असतात असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी ‘रिफ्लेक्शन ऑन इंडियाज पब्लिक पॉलिसीज’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते भारतीय प्रशासकीय सेवेतल्या १९८४ च्या तुकडीचे अधिकारी या पुस्तकाचे सहलेखक आहेत.

भारतीय प्रशासनाचं पारदर्शकता, उत्तरदायित्व, अंकेक्षण, नवनिर्मिती आणि उद्योजकता यांवर आधारित प्रारूपाकडे जग असूयेनं पहात असल्याचं ते म्हणाले  योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे सबलीकरण आणि असुरक्षित घटकांचा विकास होत असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वात दुर्लक्षित घटकांना देखील आवश्यक सेवा सहज उपलब्ध होत असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरी सेवकांनी अत्यंत अभिमानाने देशसेवा करावी असं आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image