जम्मू -काश्मीर राजभवनात महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीर राजभवनात काल महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. उपराज्यपाल मनोज सिंह यांनी या दिवसाचं औचित्य साधून दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि स्वातंत्र्य सेनानी, शहीद तसंच देशाच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्ती यांना श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात संपूर्ण देशासमोर गौरवशाली उदाहरण समोर ठेवलं, असं उपराज्यपाल म्हणाले.