‘द केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘द केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. केरळमधली डावी लोकशाही आघाडी आणि काँग्रेस पक्षाने चित्रपटावर हेट स्पीच - द्वेषपूर्ण भाषणाला चालना देण्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली असून, न्यायालय या चित्रपटावर कोणताही शिक्का लावू शकत नाही, चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाला आव्हान द्यायचं असेल तर योग्य व्यासपीठावरून प्रयत्न करावेत, असं न्यायालयानं सांगितलं. 

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image