G20 विज्ञान शिखर परिषद त्रिपुरातील आगरतळा इथं सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) G २० परिषदेची दोन दिवसीय विज्ञान-२० परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली त्रिपुरातील अगरतला, इथ हपानिया इंटरनॅशनल फेअर ग्राउंडवर आजपासून सुरु झाली. G२० बैठकीचा एक भाग म्हणून 'क्लीन एनर्जी फॉर ग्रीनर फ्युचर' संकल्पना असणाऱ्या या विज्ञान परिषदेत ६० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत. सुरक्षित भविष्यासाठी जगाला भेडसावत असणाऱ्या गंभीर समस्यांवर त्वरित कृती करणे आवश्यक असल्याच भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार अजय सूद यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितलं.

संपूर्ण जगातील देशांचे लक्ष वेधून घेणारं ग्रीन हायड्रोजन समुद्राच्या भरती-ओहोटीच तंत्रज्ञान आणि ऊर्जा संचयनाद्वारे मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरण्यासाठी लिथियम इलेक्ट्रो-रसायनशास्त्राच्या पलीकडे विचार करण्याची आवश्यकता, या मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. तसंच गुजरातमध्ये सुद्धा गांधीनगर इथं एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुप बैठकीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी, शाश्वत शीतकरणासाठी जागतिक संक्रमण सक्षम करण्यावर चर्चा सुरु आहे. उर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार आणि G२० देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महिला आणि बाल विकास मंत्रालयाची दुसरी G२० EMPOWER बैठक उद्यापासून तिरुवनंतपुरम, केरळ इथं सुरु होत आहे. ही बैठक महिला सक्षमीकरण आणि समानतेद्वारे आर्थिक समृद्धी या संकल्पनेवर वर आधारित आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image