राज्यातल्या २ हजार ६६६ सदस्य, आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांसाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सव्वीसशेहून जास्त ग्रामपंचायतींमधल्या २ हजार ६६६ सदस्यपदांसाठी तसंच थेट निवडल्या जाणाऱ्या १२६ सरपंचपदांसाठी येत्या १८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने काल या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. सदस्यांचं निधन, राजीनामा किंवा सदस्य अपात्र घोषित झाल्यानं ह्या निवडणुका होणार आहेत.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २५ एप्रिलपासून भरता येतील, त्याची मुदत २ मे पर्यंत राहील. ३ मे रोजी अर्जांची छाननी होईल आणि ८ मे रोजी दुपारी तीन पर्यंत माघार घेता येईल. १८ मे रोजी मतदान आणि १९ मे रोजी मतमोजणी होणार आहे.