डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील ३४ फौजदारी गुन्ह्यांबाबत न्यायालयात सुनावणी सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील ३४ फौजदारी गुन्ह्यांबाबत मॅनहटन इथल्या फौजदारी न्यायालयात सुनावणी सुरू असून मंगळवारी ४ एप्रिलला त्यांनी याप्रकरणी आपण दोषी नसल्याचा दावा केला. 

प्रौढ चित्रपटामंधील तारका स्टॉर्मी डॅनियल्स हिच्या बरोबरचे कथित प्रेमसंबंध लपवून ठेवण्यासाठी ट्रंप यांनी तिला पैसे देऊ केल्या प्रकरणी २०१६ पासून तपासाचं काम सुरू आहे, मात्र ट्रम्प यांनी सातत्यानं हे संबंध असल्याचं नाकारलं आहे. अधिकृतपणे  फौजदारी आरोप दाखल झालेले ते पहिले अमेरिकेचे माजी अध्यक्ष ठरले आहेत.