शालेय शिक्षण अभ्यासक्रमात “कृषी विषय” समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शालेय शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कृषी विषय समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्त केला. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते करण्याची कृषि विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव आणि संवेदनशीलता निर्माण होईल, असा विश्वास यावेळी सत्तार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांची तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करतील, असं केसरकरांनी सांगितलं.