केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरासंबंधीची याचिका सर्वोच्च न्य़ायालयाद्वारे अमान्य

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातल्या १४ विरोधी पक्षांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय - ईडी, यासारख्या केंद्रीय संस्थांच्या गैरवापरासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी ही याचिका मागे घेतली आहे. या केंद्रीय तपास संस्थाकडून करण्यात येणारी अटक, रिमांड तसंच जामिन देण्याबाबत नविन मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची मागणी, या याचिकेत विरोधी पक्षांनी केली होती. मात्र राजकीय व्यक्तींसाठी वेगळे निकष किंवा मार्गदर्शक तत्त्व लागू करता येणार नाहीत असं न्यायालयानं स्पष्ट करत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.