कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा १३ प्रादेशिक भाषांमधे घ्यायला केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागाची मंजुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी निवड आयोगातर्फे विविध प्रकारची कामं करणारे बिगर तांत्रिक कर्मचारी निवडण्यासाठीची परीक्षा, तसंच संयुक्त उच्च माध्यमिक स्तरावरची परीक्षा १३ प्रादेशिक भाषांमधे घ्यायला केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागानं मंजुरी दिली आहे.

स्थानिक युवकांचा सहभाग वाढवण्याच्या, तसंच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे आता हिंदी आणि इंग्रजीबरोबरच मराठी, गुजराती, आसामीज, बंगाली, मल्याळम, कन्नड, तामीळ, तेलगू, ओरिया, ऊर्दु, पंजाबी, मणीपुरी आणि कोकणी, या प्रादेशिक भाषांमधूनही प्रश्नपत्रिका तयार केल्या जातील. अशा प्रकारची पहिली परीक्षा येत्या २ मे पासून सुरु होईल. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image