दूरदर्शनतर्फे गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या यशस्वी कामगिरीचा माहितीपट प्रसारित करण्यात येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दूरदर्शनतर्फे, गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या यशस्वी कामगिरीचं दर्शन घडवणारा माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे. “धरोहर भारत की-पुनरुत्थान कि कहानी’’ या नावाने हा माहितीपट दोन भागात दाखवण्यात येईल. उद्या आणि परवा रात्री ८ वाजता हे भाग अनुक्रमे प्रसारित होतील.

नव्या भारताच्या घडणीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना आणि त्याची अंमलबजावणी यावर आधारित पहिला भाग आहे तर दुसरा भाग भारताची सांस्कृतिक परंपरा,अखंडता आणि त्याचा अभिमान दर्शवण्यात आला आहे.