शेती व्यवसाय आणि प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची - शरद पवार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेती व्यवसाय आणि  प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची आहे ,असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  पुरस्कृत, महात्मा फुले एग्रीकल्चर फर्म कृषी पदवीधर संघटनेची, आज अमरावती इथं स्थापना करण्यात आली,यावेळी घेतलेल्या पहिल्या अधिवेशन ते बोलत होते.

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं  आवश्यक आहे. शेती व्यवसाय समृध्द करायचा असेल तर शेतकऱ्यांसोबत कृषी पदवीधारकांना  बळ  देऊन त्याच्या पाठशी उभं  राहणं आवश्यक असल्याचं पवार म्हणाले.  येत्या काळात शेतकऱ्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस ही कृषी पदवीधारकांच्या भक्कमपणे पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही शरद पवार यांनी यावेळी दिली.