देशात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. हनुमान जयंती निमित्त आज नवी मुंबईत घणसोली इथल्या हनुमान मंदिरात आकर्षण रोषणाई आ़णि फुलांची सजावट करण्यात आली आहे. गोठीवली गाव, रबाले, तुर्भे इथल्या पारंपरिक मंदिरातही जयंतीनिमित्त भजन किर्तन सादर करण्यात येत आहे. हा उत्सव साजरा होत असताना कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल याची काळजी घ्यावी, यामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न झाल्यास त्यावर बारकाईनं लक्ष ठेवावं, अशा सूचना गृह मंत्रालयानं दिल्या आहेत.