आयुष मंत्रालय येत्या सोमवारी वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयुष मंत्रालय येत्या सोमवारी नवी दिल्लीत एका वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार आहे. ‘होमिओपरिवार-सर्वजन स्वास्थ्य, एक आरोग्य,एक कुटुंब’ ही परिषदेची संकल्पना आहे. होमिओपॅथीचे जनक डॉक्टर ख्रिस्तियन फ्रेडरिक सॅम्युएल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो.

या परिषदेत धोरणात्मक मुद्दे, होमिओपॅथीचा प्रसार, संशोधन आणि होमिओपॅथी चिकित्सा या विषयांवर विविध सत्र आयोजित केली जाणार आहेत. यावेळी, होमिओपॅथीच्या भविष्यकालीन वाटचालीविषयी परिसंवादांचं आयोजनही केलं जाणार आहे. 

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image