विभागीय महारोजगार मेळाव्याचे २१ एप्रिल रोजी आयोजन

 

पुणे : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचार प्रबोधन वर्ष २०२३ च्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बानाई संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी पिंपरी येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रामधील खाजगी उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्याकडून सुमारे 2 हजारपेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहे. या पदांकरीता किमान इयत्ता १० वी, १२ वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविकाधारक, अभियांत्रिकी पदवी, एमबीए, बीसीए उत्तीर्ण आदी पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपले पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image