प्रधानमंत्री मुद्रा योजनेला ८ वर्ष पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी आठ एप्रिल २०१५ रोजी आठ वर्षांपूर्वी सुरु केलेली प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना देशातील सुशिक्षित बेरोजगार आणि नवउद्योजकांना आधार देणारी ठरली असून आत्तापर्यंत तेहतीस कोटी ९७ लाख ५८ हजार ३३७ नव उद्योजकांना याचा लाभ झाला आहे, त्यातून त्यांना ९ लाख २९ हजार २५८ कोटी रक्कम रुपयाचं मुद्रा लोन वाटप करण्यात आलं आहे, यात ६९ टक्के महिलांना कर्जवाटप करण्यात आलं.  प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेमुळे रोजगाराच्या संधी तळागाळापर्यंत पोहोचल्या असून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.