चीनी अधिकारी चीनमधील भारतीय पत्रकारांचा निवास सातत्यानं सुविधाजनक करतील अशी भारताला आशा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनी अधिकारी चीनमधील भारतीय पत्रकारांचा निवास सातत्यानं सुविधाजनक करतील अशी भारताला आशा असल्याचं मत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केलं. ते काल संध्याकाळी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना बोलत होते.

चिनी पत्रकारांकडे पत्रकारितेसाठी भारतीय व्हिसा आहे असं त्यांनी यावेळी त्यांनी सांगितलं. चीननं दोन भारतीय पत्रकारांचे व्हिसा गोठवण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर बागची यांनी ही माहिती दिली. याबाबत भारत चिनी अधिकाऱ्यांच्या  संपर्कात असल्याचंही बागची म्हणाले.