मागासवर्गीयांचा अपमान देश खपवून घेणार नाही - अनुराग ठाकूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागासवर्गीयांचा अपमान देश खपवून घेणार नाही, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना सांगितलं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या विरोधाच्या मुद्द्यावर ठाकूर म्हणाले की काँग्रेस पक्षासाठी देश आणि संसदेपेक्षा एक कुटुंब मोठे आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार मागासवर्गीयांचा अपमान करत असून काँग्रेस पक्ष माफी मागत नाही, उलट दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.