महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा होणार असल्याची अजित पवारांची माहिती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : छत्रपती संभाजीनगर प्रमाणे महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा होणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पुढची सभा नागपूर इथं होणार असून, प्रत्येक सभेत केवळ दोनच नेते बोलतील, असं त्यांनी सांगितलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले छत्रपती संभाजीनगर इथल्या सभेत उपस्थित नसल्याबद्दल प्रश्न विचारला असता, पवार यांनी, प्रत्येक नेता सभेला उपस्थित असायला पाहिजे, असं आवश्यक नसल्याचं सांगितलं.