डिजीलॉकर सह खेलो इंडिया प्रमाणपत्रांचे एकत्रीकरण केल्याच्या उपक्रमाचं प्रधानमंत्र्यांकडून कौतुक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय क्रीडाप्राधिकरणानं खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेची प्रमाणपत्रं, डिजीलॉकरच्या माध्यमातून एकीकृत केल्याच्या उपक्रमाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे.  केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी याबद्दलची माहिती ट्विटवर दिली होती, त्यावर  प्रधानमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  प्रमाणपत्रं आता एका छत्राखाली असल्यानं खेळाडू, त्यांचे सहाय्यक, संबंधित अधिकारी आणि इतरांना लाभ होईल, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.