स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत १ लाख ८० हजार ६३६ खात्यांना ४० हजार ७१० कोटी रुपये मंजूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टँड अप इंडिया योजनेचा सहावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. याअंतर्गत आतापर्यंत देशभरातल्या १ लाख ८० हजार ६३६ खात्यांना ४० हजार ७१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती श्रेणींमध्ये उद्योजकतेला चालना देणं, हा या योजनेचा उद्देश आहे.

देशातल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसंच महिलावर्ग यांच्यातल्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी स्टँड- अप इंडिया योजना हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशातले उद्योजक, त्यांचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचं जीवनमान सुधारण्यासाठी स्टँड - अप इंडिया योजना महत्वपूर्ण भुमिका बजावत असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. 

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image