संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग, अंमली पदार्थ विरोधी आयोग आणि संयुक्त राष्ट्र एड्स समन्वय मंडळात भारताची एक सदस्य म्हणून निवड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग, अंमली पदार्थ विरोधी आयोग आणि संयुक्त राष्ट्र HIV अर्थात एड्स कार्यक्रम समन्वय मंडळात भारताची एक सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या तीनही संस्था संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या महत्वपूर्ण स्तंभ आहेत. सांख्यिकी आयोगामध्ये भारताची २००४ मध्येच सदस्य म्हणून निवड झाली होती. या समन्वय मंडळात भारताची निवड झाल्याबद्दल संयुक्त राष्ट्रातल्या भारतीय चमूचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अभिनंदन केलं आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ या भारताच्या संकल्पनेअंतर्गत भारत देश  संपूर्ण विश्वातल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करेल, असं संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या चमूनं म्हटलं आहे.