महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

 

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी माजी लोकसभा सदस्य समीर भुजबळ, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सह सचिव विलास आठवले, अवर सचिव मोहन काकड, सुरेश मोगल, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव महेंद्र काज, उपसभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, संचालक, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.