राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

 

नवी दिल्ली : थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  यांच्यासह  महाराष्ट्र  सदनाच्या  अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा जोतिराव फुले यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Popular posts
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी
Image
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image