समलिंगी विवाहांच्या वैधतेबद्दल प्रश्न उभे करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) समलिंगी विवाहांच्या वैधतेबद्दल प्रश्न उभे करणाऱ्या याचिका समूहावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या घटना पीठासमोर ही सुनावणी होत आहे. एस.के.कौल, एस.आर.भट, हिमा कोहली आणि पी. एस, नरसिम्हा या न्यायमूर्तीचा या पीठात समावेश आहे.

सामाजिक परिक्षेत्रातल्या या नातेसंबंधाविषयी केवळ संसदेतच चर्चा होऊ शकते, सर्वोच्च न्यायालय हा त्याकरता योग्य मंच नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. याचिकाकर्ते देशाचे प्रतिनिधी नाहीत त्यामुळे याचिकेवर सुनावणी होऊ शकते का याचा विचार प्रथम करावा असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी घटनापीठाला सांगितलं.