संयुक्त अरब अमिरातीहून आलेल्या प्रवाशांकडून विनापरवाना परकीय चलन तसंच सोनं जप्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संयुक्त अरब अमिरातीहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRI च्या अधिकाऱ्यांनी विनापरवाना आणलेलं परकीय चलन, अतिरिक्त भारतीय चलन तसंच सोनं जप्त केलं. मिळालेल्या खबरीनुसार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर संचालनालयाच्या चमूनं पाळत ठेवून १६ किलोहून जास्त सोनं आणणाऱ्या प्रवाशांना पकडलं.  काही सोनं प्रवाशांच्या अंगावर पेस्ट स्वरुपात लपवलेलं होतं,  तर काही सोन्याचे छोटे तुकडे किंवा दागिन्यांच्या रुपात सापडलं. याची एकूण किंमत अंदाजे १० कोटी रुपयांहून अधिक आहे,  तपासणीनंतर अजून ८५ लाख किंमतीचं १ किलो ८५ ग्रॅम सोनं, विनापरवाना आणलेलं 88 लाखांचं भारतीय तसंच १६ लाखांचं परकीय चलन डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी हस्तगत केलं. या प्रकरणी १८ सुदानी महिला आणि त्यांचा भारतीय म्होरक्या  यांना  DRI च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image