सरकार आपल्या दारी मोबाईल व्हॅनचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीरातील महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या 'मोबाईल व्हॅन'चं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह इथं झालं. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. ही मोबाईल व्हॅन १९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई महापालिकेतील प्रत्येक वॉर्डमध्ये फिरणार आहे. या फिरत्या व्हॅन मध्ये एल ई डी स्क्रीन असून, मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.