देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसूख मांडवीय यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. या कामासाठी १५७० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार असून प्रत्येक महाविद्यालयासाठी १० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. बीएससी नर्सिंगचं प्रशिक्षण घेतल्यांसाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे येत्या दोन वर्षात ही महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतल्याचं मांडवीय यांनी सांगितलं.