माउंट अन्नपूर्णा पर्वताच्या दरीत कोसळलेल्या अनुराग मालू या भारतीय गिर्यारोहकाला शोधण्याची मोहीम सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माउंट अन्नपूर्णा या जगातल्या दहाव्या सर्वाधिक उंचीच्या पर्वताच्या दरीत कोसळलेल्या अनुराग मालू या भारतीय गिर्यारोहकाला शोधण्याची मोहीम सुरु आहे. हा गिर्यारोहक तीन क्रमांकाच्या शिबिरापासून खाली उतरत असताना सोमवारी सुमारे ६ हजार मीटर खाली कोसळून बेपत्ता झाला आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठण्याबाबत जनजागृती करण्यासाठी अनुराग या पर्वतावर चढाई करत होता. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानीक गिर्यारोहक या पर्वताच्या दरीत उतरले आहेत. त्यांच्या मदतीसाठी कार्बन डाय ऑक्साइडचा शोध घेणारं एक हेलीकॉप्टरही तैनात करण्यात आलं आहे. दरम्यान या पर्वताच्या ८ हजार ९१ मीटर उंचीवर सोमवारी रात्री बेपत्ता झालेल्या बलजीत कौर आणि अर्जुन वाजपेयी या दोन गिर्यारोहकांना वाचवण्यात नेपाळी गिर्यारोहकांना यश आलं आहे.