कोल्हापुरातल्या श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापुरातल्या श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली असून जोतिबा डोंगरावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जोतिबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस असून मानाच्या सर्व सासनकाठ्या देखील डोंगरावर दाखल झाल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी नवीन दर्शन मंडपामधून दर्शन व्यवस्था केली आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे ५ वाजता तहसीलदारांच्या हस्ते अभिषेक होईल. नंतर दुपारी पालकमंत्र्यांच्या हस्ते सासनकाठी सोहळा सुरू होईल. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला 'श्रीं'चा पालखी सोहळा संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image