पुणे जिल्हा जात पडताळणी समिती कडून ‘समता पर्व’ अंतर्गत विविध उपक्रम

 

पुणे : पुणे जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत १ ते ३० एप्रिल या दरम्यान 'समता पर्व' अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य सचिवांनी कळविले आहे.

या उपक्रमात जात वैधता प्रमाणपत्रासंबंधित जलदगतीने कार्यवाही करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, पुरावे यांच्या साक्षांकित प्रती जोडून आपल्या जात पडताळणीचा परिपूर्ण अर्ज तात्काळ कार्यालयात जमा करावा. ज्या जात पडताळणी अर्जामध्ये त्रुटी आहेत अशा अर्जधारकांकरिता त्रुटी पूर्तता कार्यक्रम, कार्यशाळा, सुनावण्यांचे आयोजन, दक्षता पथकामार्फत मार्गदर्शन, जात वैधता प्रमाणपत्र कार्यशाळा त्याच बरोबर सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या आश्रम शाळा, वसतिगृह तसेच शासकीय निवासी शाळातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतून जात प्रमाणपत्र वितरीत करण्याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करून जात प्रमाणपत्र मागासवर्गीय विद्यार्थाना शाळेतच उपलब्ध करून देण्याकरिता सहायक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे यांच्यावतीने शिक्षण विभागाशी समन्वय साधून नियोजन करण्यात येणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थी शैक्षणिक योजनांपासून वंचित राहू नये हा यामागील मुख्य उद्देश असून या समता पर्व उप्रकम अंतर्गत पालक व विद्यार्थ्यांना याचा अधिक लाभ होणार आहे.

समता पर्व उपक्रमात शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जात जिल्हा पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image