उष्माघातापासून असे करा स्वत:चे रक्षण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघाताच्या बातम्या येत असतात. उन्हाळ्यात काळजी न घेतल्यास उष्माघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनातर्फे महासाष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी लाखो नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला आलेल्या काही श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. यातच ११ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणयासाठी काय उपाय केले पाहिजे किंवा त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊया.....

उष्माघात म्हणजे काय?

उष्माघात म्हणजे नक्की काय तर उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे मानवी शरीराच्या तापमानात ४० अंश सेल्सिअसहून अधिक वाढ होऊ लागते. ज्यामुळे संबंधित व्यक्तीच्या महत्त्वाच्या अवयवांवर विपरित परिणाम होऊन त्यांच्या कार्यात बिघाड होतो. यालाच उष्माघात म्हटलं जातं. उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर उष्माघात होण्याचा धोका अधिक असतो. प्रचंड उष्णतेमुळे होणाऱ्या अशा उष्माघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आवश्यक ती खबरदारी घेणं आवश्यक बनलं आहे. 

 

उष्माघाताची लक्षणे

  • चक्कर येणे 

  • त्वचा लालसर होणे

  • उलट्या, मळमळ होणे

  • सुस्त वाटणे

  • डोकं दुखणे

  • ह्रदयाचे ठोके वाढणे

 

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय कराल-

  • भरपूर पाणी आणि शरबत प्यावे

  • उन्हात जाताना छत्री, टोपी किंवा रुमाल आदींचा वापर कराल.

  • उन्हाळ्यात सैल कपडे घालावे

  • आवश्यकता नसल्यास दुपारी घराबाहेर पडणे टाळावे.

  • मद्यपान टाळा

 

लहान मुलांना उष्णतेच्या लाटेसंबधित आजारापासून वाचविण्यासाठी जाणुन घ्या.

  • त्रास झालेल्या मुलाला लगेच सावलीत आणावे.

  • पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून आडवे पडण्यास सांगावे.

  • हवा येण्यासाठी पंखा चालू करावा.

  • व्यक्तीला वारंवार पाण्याचे घोट प्यायला द्यावे.

  • संवेदनशील राहून कपडे धीले करावे

  • उलटी होत असल्यास एका कूशीवर वळवावे, जेणेकरून त्यांना गुदमरणार नाही

  • मुलं बेशुद्ध असल्यास काही खायला किंवा प्यायला देण्याचा प्रयत्न करु नये.

  • उष्माघात रोखण्यासाठी काळजी घ्या. 

 

अतिजोखमीची काम करणाऱ्या कामगारांनी, महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. उष्माघात रोखण्यासाठी मालक व कामगारांनी या गोष्टींचा अवलंब करायला हवा.

  • कामाच्या ठिकाणी मालकांनी कामगारांसाठी ठंड पाण्याची सोय केली पाहिजे.

  • कामगारांना कामाच्या ठिकाणी उनाहापासून वाचण्यासाठी शेडची सोय करावी.

  • कामगारांनी दर २० मिनिटांनी पाणी प्यावे.

  • दर एक तासांनी किमान ५ मिनिटांची विश्रांती घ्यावी.

  • बाहेरील आणि कठोर कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावी

  • मालकांनी अधिक मनुष्यबळाची सोय करावी किंवा कामाची गती कमी करावी