पर्वतमाला योजनेअंतर्गत १२०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रोपवे विकसित करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पर्वतमाला योजनेअंतर्गत ५ वर्षांत २५० पेक्षा जास्त प्रकल्पांमध्ये १२०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रोपवे विकसित करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिली. ऑस्ट्रिया इथं इंटरलॅपिन २०२३ मेळाव्यात ते काल बोलत होते. भारतात सध्या असलेल्या रोपवेंच्या दर्जात सुधारणा करून प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रियन आणि युरोपीय उद्योगांना सहभागी होण्याचं आवाहन केलं. भारत सध्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या भागीदारीवर लक्ष केंद्रित करत असल्याचंही ते म्हणाले.