उदयपूर इथं G20 समुहाच्या शाश्वत वित्तीय कार्यकारी गटाची दुसरी बैठक काल पार पडली.

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-२०समुहाच्या भारताच्या अध्यक्षपदाअंतर्गत काल, राजस्थानमध्ये उदयपूर इथं जी-२० समुहाच्या शाश्वत वित्तीय कार्यकारी गटाची दुसरी बैठक पार पडली. २०२३ या वर्षाकरता सर्वसहमत कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं शाश्वत वित्तीय कार्यकारी गटानं निम्मा टप्पा गाठला असल्याचं, आर्थिक व्यवहार विभागाच्या सल्लागार गीतू जोशी यांनी, या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं.