राज्यातल्या १७ लाख कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवल्याची संघटनेची माहिती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीनं पुकारलेला आजचा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचं आणि यात राज्यातल्या १७ लाख कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्याचा निर्णय तत्काळ घेईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.  शासनाकडून आज पुढच्या चर्चेबाबत काहीही सूचना आली नसल्यानं हा राज्यव्यापी संप सुरुच राहील,असं संघटनेच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.