भारतीय औद्योगिक भागीदारी संमेलनाला आरोग्यमंत्र्यांनी केलं संबोधित

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवसंशोधन, तांत्रिक सहाय्यकृत प्रणालीच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्ट्या फायद्याचे आणि जागतिक स्तरावर स्विकारता येतील अशी उत्पादनं तयार करण्याची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती सरकारकडे आहे. असं मत केद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित केलेल्या भारतीय औद्योगिक भागीदारी संमेलनाला संबोधित करत होते. एक आरोग्य सर्वसमावेशक, भागीदारी आणि विविध क्षेत्रातल्या एकत्रित प्रयत्नाने आरोग्य सुविधा अशी या संमेलनाची संकल्पना आहे. भारत एक जग एक आरोग्य यासाठी पुढाकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही गोष्ट जगाच्या सहकार्यानचं शक्य होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.