बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना अनिर्णित

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर करंडक  कसोटी क्रिकेट स्पर्धेचा अहमदाबाद इथला सामना आज अनिर्णित राहिल्यानं करंडक भारतानेच राखला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतला हा चौथा सामना होता. पहिले दोन सामने भारताने तर तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 480 तर भारताच्या 571 धावा झाल्या होत्या. पाहुण्या संघाच्या दुसऱ्या डावात दोन गडी बाद 175 धावा झाल्या असताना सामना संपला. विराट कोहलीला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला तर पूर्ण मालिकेतल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान आर आश्विन आणि रविंद्र जाडेजा यांना मिळाला.दरम्यान जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाबरोबर भारताचाही प्रवेश निश्चित झाला आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image