राज्यात सर्व वाळुचे लिलाव बंद करण्याची महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सर्व वाळुचे लिलाव बंद करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल विधानसभेत केली. अर्थसंकल्पातल्या महसूल आणि वन विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना, त्यांनी ही घोषणा केली. वाळुची नवी डेपो योजना सरकारच्या वतीने सुरु करण्यात येणार असून, काळ्या बाजारात आठ हजार रुपयांना मिळणारी वाळू साडे सहाशे रुपये ब्रासने मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे वाळू माफियांची गुंडगिरी पूर्णपणे बंद होणार असल्याचं विखे पाटील म्हणाले.