काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं कालपासून रद्द केली आहे. यासंदर्भातली अधिसूचना लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी आज जारी केली. सूरतमधल्या न्यायालयानं काल राहुल गांधी यांना दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.