नीरज चोप्राच्या ग्लोरिया स्पोर्ट्स एरेना इथं प्रशिक्षणाच्या प्रस्तावाला मिशन ऑलिम्पिक सेलची मंजुरी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याच्या टर्की इथल्या ग्लोरिया स्पोर्ट्स एरेना मधल्या ६१ दिवसांच्या प्रशिक्षणाच्या प्रस्तावाला क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलनं मंजुरी दिली आहे. 

नीरज चोप्रानं गेल्या वर्षी देखील या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं. येत्या १ एप्रिल रोजी तो प्रशिक्षणासाठी  टर्की इथं रवाना होणार असून, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम च्या  टॉप्स योजने अंतर्गत या प्रशिक्षणाचा खर्च उचलला जाणार आहे. 

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image