जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी करत, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी गेले सात दिवस पुकारलेला संप आज मागे घेतला. सरकार बरोबरची आजची चर्चा सकारात्मक होती, तसंच आपल्या मागण्या सरकारने तत्त्वतः मंजूर केल्या आहेत, अशी  माहिती राज्य सरकारी संघटनांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी दिली.

जुन्या आणि नवीन निवृत्ती वेतन योजनेचा अभ्यास करण्यासाठी  एक समिती स्थापन करून सरकार येत्या तीन महिन्यांमध्ये याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं  ते म्हणाले. कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, असं आश्वासन सरकारनं दिलं असून, सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर  रुजू व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.