‘दिलखुलास’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची २१, २२ व २३ मार्च रोजी मुलाखत

 


मुंबई  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर मंगळवार दि. 21, बुधवार दि. 22 व गुरुवार दि. 23 मार्च २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

21 मार्च रोजी जागतिक वन दिन जगभरात साजरा केला जातो. वन संवर्धन आणि वन संरक्षणासाठी शासनस्तरावर विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत. या योजना व उपक्रमांची माहिती प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांनी विस्तृत आणि उपयुक्त माहिती ‘दिलखुलास’  कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image