लहान शेतकऱ्यांची प्रगती झाल्याने देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल- मंत्री नरेंद्र सिंग तोमर
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): देशातल्या लहान शेतकऱ्यांची प्रगती झाली तर त्यामुळे देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल असं कृषी आणि शेतकरी विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. देशात लहान शेतकऱ्यांचं प्रमाण हे ८५ टक्के असून त्यांच्यापुढे खाजगी गुंतवणूकीचं आव्हान असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.यासाठी सरकारनं दहा हजार शेतकी उत्पादक संस्था सुरु करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली असून शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी ६ हजार ८६५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.